Misal pav recipe
मिसळ पाव रेसिपी
साहित्य - 2 कप अंकुरलेली उसळ
1 tbsp चिंचेचा कोळ
बारीक चिरलेला 1 बटाटा
बारीक चिरलेला 1-2 कांदे
1 tbsp धने पावडर
1 tbsp भाजलेले जिरे पावडर
1 tbsp गरम मसाला
3 tbsp लाल तिखट
2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरची
1 बारीक चिरलेला टोमॅटो
1 tbsp जिरे
1 tbsp मोहरी
2 कप पाणी
आले लसून पेस्ट
10-12 कढीपत्ता
तेल
1 tbsp साखर
1 चिमूटभर हिंग
मीठ
पाव
गार्निशिंगसाठी - 1 बारीक चिरलेला कांदा
1 tbsp. चिरलेला कोथिंबीर
1 कप शेव
लिंबाचे तुकडे
Step 1- अंकुरलेली उसळ धुवून गाळून घ्या.
Step 2- कुकरमध्ये चिरलेला बटाटे , टोमॅटो , हळद , लाल तिखट , मीठ , चिमूटभर हिंग आणि 3 कप पाणी घालून3 शिट्टया करुन शिजवा.
Step 3- कढईत तेल गरम करा. त्यात जिरे आणि मोहरी टाका.
Step 4 - जिरे तडतडल्यावर त्यात हिंग आणि कढीपत्ता घाला . थोडया वेळाने कांदा घालून परता.
Step 5- कांदा हलका तपकिरी झाला की त्यात मीठ आणि साखर घाला.
Step 6- नंतर आले लसून पेस्ट घालून परतावे . थोडया वेळाने सर्व मसाले घालून मिक्स करावे.
Step 7- मसाले मिक्स झाल्यावर त्यात चिंचेचा कोळ घाला आणि थोडा वेळ शिजू घ्या .
Step 8 - आता त्यात उकडलेले अंकुरलेले मसूर घाला. ग्रेव्ही कमी असल्यास पाणी घाला . ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत शिजवा.
Step 9- पावावर बटर लावून पॅनच्या दोन्ही बाजूंनी बेक करा.
Step 10- पाव आणि मिसळ यांची ग्रेव्ही प्लेटमध्ये काढा. ग्रेव्हीला चिरलेला कांदा , कोंथींबीर , शेव आणि लिंबू घालून सर्ह करा.
Comments
Post a Comment