Mayani Bird Sanctuary




           मायणीला ब्रिटीशकालीन तलाव वारसा लाभलेला आहे. मायणी हे सातारापासून 65 km  अंतरावर आहे. हे निसर्गप्रमीसाठी आकर्षित आहे. मोठ्या प्रमाणात पक्षी या ठिकाणी आपल्याला पाहिला  मिळतात . निसर्गाचा अनुकुल परिस्थितीमुळे मायणी पक्षी अभयारण्याचा जन्म झाला असावा असे म्हणतात.

           11 मार्च 1987 रोजी महाराष्ट्र शासनाने मायणी पक्षी अभयारण्याची स्थापना करण्यात आली. अभयारण्याचा परिसर हा सुमारे 1080 एकर एवढा आहे . या ठिकाणचा निसर्ग आणि पक्षांचा किलबिलाट ऐकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि पक्षी मिञ येतात. 

           मायणी या ठिकाणी फ्रेंड्स ऑफ नेचर नावाची एक संस्था आहे. इ. स. 1983 पासून ही संस्था पक्षांचा संरक्षणासाठी कार्यरत आहे.

           स्थलांतरित पक्षांमध्ये रोहित पक्षांचे थवे येथे आढळतात. तसेच बदक , हळद- कुंकू हे पक्षी आढळतात. शिकारी पक्षांचा प्रजातीमध्ये कापशी घार , गरूड , ससाण , असे पक्षी सुद्धा आहेत. तसेच 85 प्रकारचे सुमारे 20 ते 25 हजार पक्षी असल्याचे नोंद आहे. तसेच युरोप , तिबेट , साइबेरिया ,लदाख आणि हिमालय या ठिकाणाहून काही पक्षी स्थलांतर करुन मायणी पक्षी अभयारण्यात आपली हजेरी लावतात.


 

सातारा ते मायणी रस्ता  ( Map)



Comments

Post a Comment