Makarsankrantila black color Che kapade ka ghaltat

  मकरसंक्रांतीला काळे रंगाचे कपडे का घालतात .






या मागे २ कारण आहेत. 

१) वैज्ञानिक आणि

२) लोकांची श्रध्दा

            हा सण जानेवारी महिन्याच्या १४ किंवा १५ तारखेला  साजरा केला जातो . जानेवारी महिन्यात थंडी असते. आणि मकरसंक्रांत उत्तरयाणाच्या काळात येते. त्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस हिवाळ्याच्या शेवटचा दिवस असतो. 

             महाराष्ट्रात प्रामुख्याने मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची जास्त प्रथा आहे. 

             दरवर्षी संक्रांत कुणावरही येवू शकते आणि ती आपल्यावर येवून आपल्याला त्रासदायक होऊ नये . म्हणून या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालतात. 

            नव दांपत्याचा मकर संक्रांतीचा सण हा खास असतो. त्या दिवशी हलव्याच्या दागीन्यांनी दोघांना सजवले जाते आणि दोघांना काळे कपडे परिधान केले जातात. कारण त्यांच्या नविन संसाराला कुणाची वाईट नजर लागू नये. 


Comments