Burger Recipe in Marathi
Burger recipe in marathi
साहित्य - 2 बन्स
1 काकडी
2 चीज काप
4-5 कोबी
1 मोठा टोमॅटो
1 कांदा
हिरव्या कोथिंबीरीची चटणी
टोमॅटो साॅस
टिक्की बनवण्यासाठी साहित्य - 3 उकडलेले बटाटे
1/2 कप उकडलेले मटार
1 चमचे आले पेस्ट
1/4 चमचे आमचूर पावडर
थोडे धने पावडर
1 हिरवी मिरची बारीक करुन
2-3 चमचे तेल
मीठ
ब्रेडचे तुकडे
कृती - step 1- सर्वप्रथम टिक्की बनवण्यासाठी बटाटे किसून घ्यावे.
Step 2- आता त्यात सर्व मसाले हळद , मीठ , जिरे , धणे पावडर ,आल्याची पेस्ट, हिरवी मिरची आणि कुटलेले बारीक ब्रेड त्यात मिक्स करा.
Step 3- आता एका कढईत 2-3 चमचे तेल टाका. आणि पॅन गरम करुन घ्या.
Step 4- आता पुढे बटाटाच्या मिश्रणातून थोडे मिश्रण घ्या . आणि त्याचा एक बॅल बनवा. मग त्याला नीट गोल करा आणि तळहातावर सपाट करा.
Step 5- नंतर ते ब्रेडच्या चुरा मध्ये पसरवा. तळहातावर हलके दाबून टिक्कीला आकार घ्यावे. अशाप्रकारे सर्व टिक्की तयार करावे.
Step 6- टिक्की तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूनी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या.
Step 7 - नंतर काकडी सोलून घ्या. गोल काप करा . टोमॅटो चांगले धुवून गोल काप करुन घ्या.
Step 8- आता बर्गर मधोमध कापून तव्यावर तेल ओता आणि दोन्ही बाजूंनी गरम करा. या प्रकारे दुसरा बनही बनवा.
Step 9- आता बर्गर बनवण्यासाठी सर्वप्रथम बनचा एक तुकडा घ्या . त्याला एक चमचा टोमॅटो साॅस लावा. मग काकडीचा तुकडा त्यात ठेवा. नंतर चाट मसाला शिंपडा त्यानंतर टिक्की ऍड करा. यावर कोबी घाला आणि नंतर चीजचे तुकडे ठेवा. कांघ्याचे काप ठेवा. नंतर घाट मसाला आणि नंतर टोमॅटो चे काप टाका. बनचा दुसरा तुकडा घ्या , त्यावर हिरव्या कोथिंबीरीची चटणी लावा . टोमॅटो च्या कापांवर ठेवा
.
Comments
Post a Comment